भर पावसात शालेय विदयार्थ्यांसह प्रवाशाचें हाल ?
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर
- ईगतपुरी तालुक्यातील परिवहन आगारास नवे आगारप्रमुख लाभल्यानंतर एस.टी.चा कारभार सुधरेल अशी अपेक्षा होती.मात्र ईगतपुरी आगाराच्या गलथान कारभारात आणखीनच तीव्र वाढ झाली असल्याच्या तक्रारी प्रवाशी करत असुन एस.टी.ची अवस्था भीक नको पण कुत्रे आवर अशी झाली आहे.
एस.टी.चे ग्रामीण भागातील वेळापत्रक कोलमडले असुन वाहतुक नियंत्रण करणार्या कर्मचार्यानांही कोणती एस.टी.कधी येईल हे सांगणे दुरापास्त झाले आहे.
ईगतपुरी आगारात नादुरुस्त बसेसची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. कारण बस कधी येणार ? या प्रश्नाला, बसचे दुरुस्तीचे काम सुरु आहे असेच उत्तर मिळत आहे. दुसरीकडे बस इंधनाचा डिझेलचाही मोठा प्रश्न असुन काही बसेस चक्क इंधनाअभावी उशीरा सुटतात तर काही जागेवरच उभ्या राहतात असा दावा प्रवाशानीं केला आहे.
ईगतपुरी आगाराचे आधिकारी तर आवो जावो घर तुम्हारा या उक्तीप्रमाणे सगळा भार कनिष्ठ कर्मचारी यावर टाकुन मोकळे होत आहेत.
आदिवासी भागातील शालेय फेरी बंद
दरम्यान शासनाने शालेय विदयार्थ्याच्यां सोईसाठी बसेस देऊनही या बस फेर्या शालेय वेळापत्रकानुसार आवश्यक वेळेत धावत नसल्याने शालेय विदयार्थ्याचें प्रचंड हाल सुरु आहे. मात्र तक्रारी केल्यानंतर ही थातुर मातुर उत्तरे दिली जात आहे.
शासनाने प्रवाशी वर्गानां विविध सवलती देऊ केल्या आहेत. मात्र ढिसाळ व्यवस्थापनामुळे या सेवाचांही बोजवारा उडाला असुन सवलती नको तर वेळेवर सेवा दया अशी मागणी प्रवाशी करत आहे.

