पंढरपूर प्रतिनिधी
महाराष्ट्रात चालू असलेल्या गढूळ राजकारणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक सही संतापाची हे अभियान शनिवार दिनांक 8 जुलै व रविवार दिनांक 9 जुलै रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राबविण्यात आले आहे .
याचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील ,शहराध्यक्ष संतोष कवडे,विधानसभा अध्यक्ष अनिल बागल ,सहकार सेनेचे कृष्णा मासाळ,उपशहर अध्यक्ष गणेश पिंपळनेरकर ,उपअध्यक्ष ओंकार आंब्रे, विभाग अध्यक्ष नागेश इंगोले, सागर घोडके ,सुरज देवकर ,वैभव इंगोले ,विद्यार्थी सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष अवधूत गडकरी,तालुका अध्यक्ष प्रताप भोसले ,प्रथमेश धुमाळ, उत्तम कुळकर्णी, विक्रम पाटील, चैतन्य विधाते ,इत्यादी उपस्थित होते.

