पंढरपूर प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज येथे पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने आगामी आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचे निमंत्रण देण्यात आले.
यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह समितेचे सदस्य अँड. माधवी देसाई- निगडे, प्रकाश जवंजाळ, श्रीमती शंकुतला नडगिरे आदी उपस्थित होते. समितीच्यावतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा श्री विठ्ठल रुक्मिणीची मुर्ती देऊन तसेच पारंपारिक पद्धतीने सत्कारही करण्यात आला.