१५ जून : मंगेश चिवटे यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने विशेष लेख प्रसिध्द करत आहोत.
प्रमुख,मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तथा मा. मुख्यमंत्र्यांचे ओ.एस.डी.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असं *कल्याणकारी राज्य* उभारण्यासाठी अन् शाहू -फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी राज्यात सर्वधर्मीय लोकांचा शिक्षणासह *आरोग्य* हा मूलभूत प्रश्न सोडविणे क्रमप्राप्तच ठरते.या धर्तीवरच सामाजिक जाण असलेल्या एका रुग्णदुताने अर्थातच मंगेश चिवटे यांनी राज्यातल्या गोरगरीब, निर्धन लोकांचे आरोग्यसंबंधीचे जटिल प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची संकल्पना पूर्वाश्रमीचे नगरविकास मंत्री अन् आत्ताचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांच्या पुढे ठेवली अन् त्याला पसंती दर्शवत लगेचच त्यांनी मान्यता दिली.
आनंदाची गोष्ट म्हणजे हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची मुहूर्तमेढ १७ नोव्हेंबर २०१७ रोजी ठाणे-कोपरी येथील शिंदेसाहेबांच्या जनसंपर्क कार्यालयात झाली अन् जणू गोरगरीब,गरजू रुग्णांना आपलं आरोग्य सुदृढ व निरोगी ठेवण्यासाठी संजीवनीच मिळाली.
एवढं करून शिंदेसाहेब थांबले नाहीत.त्यांनी ज्या रुग्णदूतानेही संकल्पना मांडली,त्या चिवटेसरांना कक्षाचे राज्य प्रमुख म्हणून सूत्रे सोपविली.अन् पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत अभिनंदनही केलं.मित्रहो,बघता-बघता या रोपट्याचं वटवृक्ष होऊन गेल्या ५ वर्षांत मदत कक्षाच्या माध्यमातून राज्यातल्या सर्व जाती-
धर्मातील आर्थिकदृष्या दुर्बल घटकांना उच्चप्रतीच्या मोफत वा अल्प दरात आरोग्य सेवा मिळाल्यात.राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार अन् खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे यांचं मार्गदर्शन तर,चिवटेसरांच्या खंबीर नेतृत्वाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाने तनमनधनाने रुग्णसेवा करत राज्यात आपली पाळेमुळे घट्ट रोवली आहेत.अशा अष्टपैलू नेतृत्वाला अर्थातच मंगेश चिवटेसर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 💐🎂🙏
वाढदिवसाचे औचित्य साधून चिवटेसरांचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊया.मंगेश चिवटेसर यांचा जन्म १५ जून १९८८ रोजी स्वातंत्र्यसेनानी साथी मनोहरपंत चिवटे(आजोबा) यांच्या देशप्रेमी घराण्यात झाला अन् जणू राज्यातील गोरगरीब,निर्धन लोकांच्या आरोग्याची कणव असलेला रुग्णदुतच उदयास आला.वंदनीय मनोहरपंत चिवटे हे करमाळाचे (जि.सोलापूर) पहिले नगराध्यक्ष म्हणून सोलापूर जिल्ह्यात परिचित आहेत.चिवटेसरांच्या वडिलांचे नाव नरसिंह मनोहरपंत चिवटे अन् आईंचे नाव सौ.मंदाकिनी नरसिंह चिवटे. तर पत्नीचे नाव सौ.शिल्पा चिवटे असून एक पुत्र व पुत्री असा त्यांचा परिवार आहे.चिवटे घराण्याला स्वातंत्र्यसेनानीची पार्श्वभूमी लाभल्याने त्यांची जनमानसात राष्ट्रभक्त,समाजसेवी,त्यागी
अन् गोरगरीब लोकांची कणव असलेले कुटुंब अशी ओळख आहे.चिवटेसरांनी आपल्या आजोबांच्या पाऊलखुणा ओळखत त्यांचा आदर्श घेऊन ते रुग्णसेवेत आपलं भरीव योगदान देताहेत,ही कौतुकास्पद गोष्ट आहे.
शालेय जीवनापासूनच मंगेश चिवटे हे एक हुशार विद्यार्थी म्हणून नावरूपाला आले.त्यांचे शालेय शिक्षण करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयात तर,महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या एस.पी.कॉलेज मध्ये झाले.त्यांनी मराठी विषयात एम.ए. करून नंतर बी.एड.केलं.तसेच त्यांनी पत्रकारिता विषयात देखील पदवी संपादन केली.एवढं शिक्षण घेऊन ते थांबले नाहीत.मुंबईच्या के.सी.कॉलेजमध्ये लॉ फॅकल्टीची दोन वर्षे पूर्ण करून ते आता शेवटच्या वर्षाला अपियर आहेत.एक *छंद* म्हणून ते गडकिल्यांचा प्रवास करून ह्या विषयात संशोधन करत आहेत.आतापर्यंत चिवटे सरांनी ५० गडकिल्ल्यांना भेटी दिल्या असून,पन्हाळगड ते पावणखिंड हा प्रवास ते गेल्या १० वर्षांपासून नित्यनेमाने करत आहेत. ते खऱ्या अर्थाने शिवभक्त अन् शिवशंभो इतिहासाचे गाडे अभ्यासक आहेत,हे दृष्टोत्पत्तीस येते.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख म्हणून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चिवटेसरांचं तोंड भरून कौतुक करून शिंदेसाहेबांनी त्यांना *उत्कृष्ट रुग्णसेवेचा उपहार* म्हणून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख म्हणून नियुक्त केले.याशिवाय ते मुख्यमंत्र्यांचे ओ.एस.डी.देखील झाले.तर त्यांच्या रिक्त जागी रुग्णसेवक रामहरी राऊत यांना शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य प्रमुख तर,सहकक्ष प्रमुख म्हणून ज्ञानेश्वर धुळगंडे(माऊली)यांची नियुक्ती केली.गेल्या पाच वर्षांपासून राज्यातील
कानाकोपऱ्यातून कोपरी,ठाणे येथील मुख्यालयाला हजारों रुग्णांची *कृतज्ञता पत्रे* प्राप्त होताहेत,ही प्रशंसनीय बाब असून चिवटेसर अन् त्यांच्या टीमच्या कठोर परिश्रमाचं फलित आहे.जात,धर्म,पंथ तथा राजकीय अभिनिवेश यांच्या पलीकडे जाऊन मानवता धर्माच्या आधारावर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष आज राज्यातील लाखो गोरगरीब,निराधार,गरजू रुग्णांना आपल्या गंभीर अन् महागड्या शस्त्रक्रिया करण्यासाठी विनाविलंब अर्थसहाय्य उपलब्ध करून देताहे,ही खऱ्या अर्थाने *आरोग्य क्रांती* च म्हणावी.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अन् उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-बी.जे.पी.महायुती सरकारच्या गेल्या ११ महिन्यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून राज्यातल्या ९,६९९ गरजू रुग्णांना ७१ कोटी ६८ लाख रुपयांचे अर्थसहाय्य अदा करण्यात आलं,ही राज्यातली न भूतो न भविष्यती अशी रुग्णसेवा चिवटेसरांच्या प्रामाणिक प्रयत्नांची परिणती आहे.खरं तर, त्यांच्या अथक प्रयत्नांची ही फलश्रुती आहे,असे म्हणणे उचित ठरेल.
किल्ले रायगड येथे गेल्या दोन वर्षापासून अखंड पुष्पहार अर्पण सेवा हा नाविन्यपूर्ण उपक्रम खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे अन् मंगेश चिवटेसर यांच्या माध्यमातून राबविला जात आहे.डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि करमाळा येथील चिवटे बंधूंचे मुक्ताई गारमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने शिवछत्रपतींच्या मुर्तीला अन् तेथील अन्य देवस्थानांना अखंड पुष्पहार अर्पण सेवा सुरू केली आहे.त्यामुळे छत्रपतींच्या मूर्तीचे सौंदर्य अन् पावित्र्य अधिकच उजळून निघत आहे.सदर स्तुत्य उपक्रमाची कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.ही गोष्ट श्रीकांतदादा अन् चिवटेसरांच्या दृष्टीने मोठ्या सन्मानाची आहे.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुखपद स्वीकारण्याआधी
चिवटेसरांनी स्टार माझा,जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी,साम टी व्ही,आय बी एन लोकमत अशा ख्यातनाम वाहिन्यांमध्ये विविध पदांवर काम केलं.विशेष म्हणजे शरदजी पवार,नितीनजी गडकरी,विलासराव देशमुख,आर.आर.पाटील अशा २०० दिग्गज नेत्यांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या अन् त्याद्वारे पत्रकार म्हणून जनमानसावर आपल्या कामाचा ठसा उमटवून आपलं सामाजिक कर्तव्य प्रामाणिकपणे बजावलं.त्यांच्या
साहसीवृत्तीचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे त्यांनी एका कॅमेरामनच्या भूमिकेतून मागच्या काळात झालेल्या हॉटेल ताज वरील आतंकवाद्यांच्या हल्ल्याचे थरांरक प्रसंगाचे चित्रीकरण एका कारचा आडोसा घेऊन केलं होतं.याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक झालं.उल्लेखनीय बाब म्हणजे चिवटेसरांची राज्यात अजातशत्रू म्हणून ओळख असल्याने पूर्वीपासूनच त्यांची सर्वपक्षीय नेत्यांशी नाड जुळली आहे.त्याची परिणती म्हणजे राज्यात आरोग्य शिबिरासाठी चिवटेसर कोठेही गेले तरी सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यांना सर्वतोपरी सहकार्य मिळत असते.हेच त्यांच्या सामाजिक कार्याचं खरं फलित आहे.उल्लेखनीय गोष्ट म्हणजे थोर समाजसेवक आण्णा हजारे,विश्वगुरू रवी शंकर,छत्रपती संभाजी महाराज,छत्रपती उदयनराजे भोसले,मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेसाहेब यांनीही रुग्णदुत मंगेश चिवटेसर यांच्या रुग्णसेवेची मुक्तकंठाने प्रशंसा केली.खरं तर हे चांगल्या कामाचं फळ आहे.
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद मनी बाळगून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन ह्या दोन्ही सेवाभावी संस्था हातात हात घालून ना.एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षांपासून रुग्णसेवेसाठी तनमनधनाने कार्यरत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून कक्ष प्रमुख मंगेश चिवटे व त्यांच्या मदत कक्षाच्या टीमने राज्यात आजमितीपर्यत १,००० हून अधिक महाआरोग्य शिबिरांसह नेत्रचिकित्सा,चष्म्यांचे मोफत वाटप,रक्तदान शिबिरे आयोजित करून सुमारे सहा लाखांहून अधिक गोरगरीब लोकांना त्याचा लाभ मिळवून दिला,हा या क्षेत्रातील खऱ्या अर्थानं उच्चांकच आहे.या आरोग्य शिबिरांच्या आयोजनाने सर्वधर्मीय लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.वास्तवात चिवटेसरांचे कठोर परिश्रम,चिकाटी,
कर्तव्यदक्षता,रुग्णसेवेची दुर्दम्य इच्छाशक्ती व गोरगरीब लोकांच्या स्वास्थ्याविषयी असलेली कणव यातून गेल्या पाच वर्षात मदत कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांच्या गंभीर व महागड्या अशा १७,५०० हून अधिक शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्या,ही वाखाणण्याजोगी गोष्ट आहे.
त्यात कर्करोग,बायपास,अँजिओप्लास्टी,कोकलियर, इम्प्लांट,मोतीबिंदू,ब्रेन ट्युमर,किडनी ट्रान्सप्लांट लिव्हर ट्रान्सप्लांट,लहान मुलांच्या हृदयावरील छिद्राचे ऑपरेशन आदी शस्त्रक्रियांचा समावेश आहे.महत्वाचे म्हणजे हाता पोटावर गरिबीचे जीवन जगणाऱ्या पालकांना अशक्यप्राय असलेल्या आपल्या बालकांच्या हृदयाचं ऑपरेशन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून पार पडले,ही अतुलनीय गोष्ट आहे.राज्यातल्या सुमारे ४,००० पेक्षा जास्त लहान मुला-मुलींच्या हृदयावरील छिद्राचे ठाण्याच्या सुप्रसिद्ध ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झाली.आता ती मुलं मोकळा श्वास घेत असून,त्यांच्यात जगण्याची नवी उमेद मिळाली आहे.वास्तविक पहाता,रुग्णदुत मंगेश चिवटे यांनी वैद्यकीय क्षेत्रात प्रस्थापित केलेला हा एक विक्रमच म्हणता येईल.
उल्लेखनीय बाब म्हणजे कोरोना काळात रुग्णांना ने-आन करण्यासाठी राज्यात जेथे जेथे रुग्णवाहिकांची निकड होती,त्या त्या ठिकाणी सुमारे १०० रुग्णवाहिन्यांचे वाटप करण्यात आले.वास्तवात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे अन् कक्ष प्रमुख मंगेश चिवटेसर हे तिन्ही रुग्णदुत कोरोना काळात सर्वधर्मीय लोकांसाठी खऱ्या अर्थानं संकटमोचक ठरलेत,असे म्हणणे संयुक्तिक ठरेल.
खरं तर कोरोना काळादरम्यान रुग्णसेवेसाठी गावोगावी हिंडल्यामुळे चिवटेसरांना दुर्दैवाने कोरोनाची लागण झाली होती. यास्तव त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.तथापि ईश्वराच्या कृपेने त्यांनी कोरोनावर मात केली व ते पुनश्च रुग्णसेवेत रुजू झाले.रुग्णसेवेचं एवढं मोठं पुण्यकर्म केल्यावर आपण आयुष्यमान होणारच सर...!
म्हणूनच मंगेश चिवटेसर यांना राज्यातील सर्वधर्मीय लोक कौतुकाने रुग्णदुत म्हणत असतात.वास्तवात हीच खरी त्यांच्या रुग्णसेवेची पावती आहे.समाजातील गोरगरीब,निराधार लोकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आई जगदंबे त्यांना मोठं बळ देवो,ही तिच्या चरणी प्रार्थना!कारण रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा असते.चिवटेसरांना आरोग्यदायी असं दीर्घायुष्य लाभो,ही सदिच्छा आम्ही समस्त रुग्णसेवक या मंगलमय दिनी व्यक्त करतो.जय महाराष्ट्र!
लेखक - रणवीर राजपूत
प्रसिद्धी विभाग,शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष,महाराष्ट्र राज्य
मो.न.९९२०६७४२१९