पंढरपूर प्रतिनिधी
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष निधीतून भोसे गावचे शेतकरी उमेश मधुकर गावंधरे यांना-१ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे.
ही मदत मिळवून देण्याकरता युवासेना सोलापूर जिल्हा प्रमुख बालाजी उद्धव बागल यांनी विशेष पाठपुरावा केला.
भोसे गावचे सुपुत्र उमेश मधुकर गावंधरे यांचा अपघातामध्ये एक पाय फ्रॅक्चर झाला होता.पायावर करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिये करता मिरजचे प्रसिद्ध हाडाचे डॉ.जी.एस.कुलकर्णी ऑर्थोपेडिक हॉस्पिटल मिरज येथे ऍडमिट करण्यात आले होते. त्यांच्या ऑपरेशन करता -१ लाख रुपये ची आवश्यकता होती. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्यांना-१ लाख रुपये जमवणे कठीण जात होते. अशावेळी सोलापूर युवासेना जिल्हाप्रमुख बालाजी उद्धव बागल यांच्या माध्यमातून त्यांना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे (साहेब) यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून-१ लाख रुपये महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (सर) व शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत (सर) यांच्या मार्गदर्शनाखाली-१ लाख रुपयांची मदत देण्यात आली.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष निधीचे मंगेश चिवटे यांच्या विशेष प्रयत्नाने हा निधी मंजूर करून रुग्णाला तो वितरित करण्यात आला.युवासेना जिल्हाप्रमुख सोलापूर बालाजी उद्धव बागल यांच्या हस्ते उमेश मधुकर गावंधरे यांना-१ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी गावंधरे कुटुंब व भोसे गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.