सोलापूर प्रतिनिधी
विनायक नगर येथील राजराजेश्वरी माध्यमिक प्रशालेचा दहावीचा निकाल शंभर टक्के इतका निकाल लागला.रितू अण्णा कलबुर्गी (९२.४०%), श्रीनाथ मलेशम कुडक्याल (९१.८०%), अमृता हरिकृष्ण चलमेटी(९१.००%) या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय ,तृतीय क्रमांक पटकाविले . प्रशालेतील सर्वच १०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने १००% निकाल लागला.
२५ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह,४६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत ,३४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.
संस्थापक अध्यक्ष अण्णाराव कुंभार प्रशालेचे माजी मुख्याध्यापक रविशंकर कुंभार , विद्यमान मुख्याध्यापक विश्वनाथ तंबाके , मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, मार्गदर्शक शिक्षक शितल पाटील, संगिता नरगिडे, मारुतीराव कांबळे, रेवणसिद्ध दसले,चंद्रशेखर पाटील,रोहीत हत्तरगी , शांतेश करजगी आदींनी अभिनंदन केले.