सोलापूर प्रतिनिधी
निलम नगर येथील नेताजी प्रशालेचा दहावीचा निकाल ९८.२९ % इतका लागला. प्रशालेतील १७६ विद्यार्थ्यांपैकी १७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.३७ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण,७८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत,५७ द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.
प्रशालेतून कोमल नागनाथ कुंभार (९४.६० %), धानेश्वरी सिद्धाराम आक्का (९२.६०), निकिता देविदास अजनाळकर(९२.४० %) या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार, माजी प्राचार्य विजयकुमार हुल्ले, मुख्याध्यापक रविशंकर कुंभार ,पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे , राजेंद्र मुलगे, श्री राजकुमार मरगुरे, बसवराज तेग्गेळी यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंदानी अभिनंदन केले.