भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील ग्रामपंचायत कार्यालयात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रतिमेचे पूजन सरपंच राजकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांच्या हस्ते डॉक्टर अमृता कबाडे यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पांडुरंगाचे माजी संचालक हरिभाऊ शिंदे,माजी सरपंच सुनील पाटील,ग्रामपंचायत सदस्य रणजीत जाधव सचिन कुचेकर अर्जुन लिंगे, प्रवीण शिंदे नागेश पाटील,बापू बुरांडे , संजय मदने,विकास वाघमारे, उत्तम सराटे, सोमनाथ पाटील, दत्तात्रय चव्हाण,अरुण गायकवाड,शिक्षक काटे,अष्टपुत्रे, आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ग्रामसेवक डीएस वाघमारे यांनी मानले.