ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर
ईगतपुरी तालुक्यातील घोटी हे शहर संपुर्ण तालुक्याची मोठी बाजारपेठ. या बाजारपेठेत सातत्याने वर्दळ असते व अंदाजे लाखो रुपयाची आर्थिक उलाढाल या ठिकाणी होते.या उलाढालीतील एक प्रमुख दुवा आर्थिक व्यवहार करणार्या बैंका असतात.यात स्टेट बैंक ही महत्त्वाची मानली जाते.मात्र जुन महिन्याच्या प्रारंभीच या बॅंकेला भाडे थकल्याने टाळे ठोकण्याची पाळी आली आहे. मात्र यामुळे रणरणत्या उन्हातान्हात शेकडो नागरिकाचीं प्रचंड परवड झाली आहे.
घोटी येथील स्टेट बॅंकेचे इमारत भाडे थकल्याने मालकाने शटरला टाळे ठोकले आहे.यामुळे बैंक चक्क बंद झाली असुन सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहे.
मात्र अकस्मात् हा प्रकार घडल्याने तालुक्यातील काना कोपर्यातुन आलेल्या ग्राहकाचीं मात्र प्रचंड परवड झाली आहे.अनेकानां बैंक बंद असल्याने निराशेपोटी परतावे लागले आहे.
कुणाला बाजारासाठी, कुणाला दवाखान्यासाठी तर अनेकानां विविध कारणासाठी पैसे हवे होते. मात्र आलेला नागरिक निराश होत, कुणी शिव्या शाप देत, तर कुणी आता कुणाकडे हात पसरावे या विवंचनेत परत गेले आहेत.
------
सहा महिन्यापासून थकले भाडे
-----
गेल्या सहा महिन्यापासून स्टेट बॅंकेच्या घोटी शाखेने आपल्या इमारतीचे भाडे थकवले आहे. त्यामुळे आपण शटरला टाळे ठोकले आहे असे इमारत मालक पिचा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतानां सांगितले आहे.
-----
दरम्यान प्रस्तुत प्रतिनिधीने बैंकेच्या शाखा व्यवस्थापकाशी संपर्क केला असता संपर्क झाला नाही.तर नाशिक येथील मुख्य कार्यालयात दुरध्वनी उचलला जात नाही.
इतर कर्मचारी अळीमिळी गुपचिळी करत मौन धरुन होते. तर बैंकेच्या मागील आवारात जागा मालकाची विनवणी करतानां दिसुन आले.
-------------
आपण टाकेद येथुन पेंन्शनचे पैसे काढण्यासाठी आलो होतो.घरी काही बाजार, गोळया औषधे न्यायची होती.पण आता नाईलाज आहे.परत जावे लागणार
---- रामदास बांबळे
जेष्ठ नागरिक तथा पेंशनधारक