पंढरपूर प्रतिनिधी
सिंहगड कॉलेज कोर्टी व रोटरी क्लब पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री रामकृष्ण हारि वृद्धाश्रम व मातोश्री वृद्धाश्रम मधील सर्व वृद्धांना एक दिवसाची सहल आयोजित करून श्री गोंदवलेकर महाराज दर्शन व परिसर दर्शन करून आणण्यात आले.
यावेळी सर्व वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी सहलीचा आनंद घेतला.तसेच आयोजकांचे मनापासून कौतुक करून समाधान व्यक्त केले.
यावेळी या सहलीचे आयोजन निशा करांडे , डॉ संगीता पाटील व कु कनिष्का करांडे यांनी सर्व वृद्धांची सेवा केली व त्यांचे गोंदवले महाराज दर्शन ही घडवून आणले. तसेच बापसाहेब माने व त्यांच्या सिंहगड कॉलेजच्या सहकाऱ्यांनी सहलीसाठी विषेश परिश्रम घेतले.