पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील कौठाळी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी अनिता नागटिळक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कौठाळी ग्रामपंचायतीच्या सरपंच शारदा नागटिळक यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागेवर सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. सरपंच पदासाठी अनिता अरुण नागटिळक यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सरवळै यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.
यावेळी माजी सरपंच मोहन नागटिळक, सोसायटीचे माजी अध्यक्ष ईश्वरा धुमाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका शारदा नागटिळक, माजी सरपंच शंकर गोडसे, उपसरपंच रामदास नागटिळक,उद्योगपती अनिल नागटिळक, माजी सरपंच महादेव गाढवे, सोसायटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब धुमाळ,माजी सरपंच स्वाती धुमाळ, ग्रामपंचायत सदस्य धोंडीराम वाघमोडे,रूपाली गाढवे, सुरेखा गोडसे, दिलीप इंगळे, अण्णासाहेब नागटिळक, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मोहन पाटील,अनिल नागटिळक,सोसायटीचे चेअरमन यशवंत मोकाशी,रघूनाथ गोडसे, परमेश्वर धुमाळ, अरुण धुमाळ ,वसंत नागटिळक यांच्या सह बहूसंख्या मान्यवर उपस्थित होते.