म्हसवड प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेस अधिक सक्षम करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत आणि तरुणांना रोजगार देण्यासाठी व माणच्या शेतीला पाणी देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असा विश्वास राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व हरणाई सहकारी सुतगिरणीचे चेअरमन रणजीत सिंह देशमुख यांनी व्यक्त केला.
माण तालुक्यातील तरुणांना रोजगार मिळण्यासाठी स्थापना केली असून माण तालुक्यामध्ये प्रबोधनकार मागासवर्गीय सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात आलेला आहे. याचप्रमाणे माण खटाव तालुक्यात औद्योगिक विकास होण्यासाठी उद्योग व्यवसाय सुरू करण्यात येणार आहेत.
प्रबोधनकार सहकारी साखर कारखाना,हरणाई सहकारी सुतगिरणीचे चेअरमन तथा राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रणजीत सिंह देशमुख यांनी म्हसवड येथे नुकतीच भेट दिली.
कर्नाटकातील जनतेने मोदी व शहा यांच्या हुकुमशाही ला मत पेटीतून हद्दपार केले आहे, याचप्रमाणे महाराष्ट्रातील जनता मोदी शहा यांची हुकूमशाही मोडून काढेल. असेही ते म्हणाले.
यावेळी म्हसवड येथील ज्येष्ठ पत्रकार विजय टाकणे यांनी त्यांचे स्वागत केलं या वेळेला मान तालुका रस्ते काँग्रेस अध्यक्ष बाबासाहेब माने नगरसेवक गणेश रसाळ निलेश घार्गे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.