पंढरपूर प्रतिनिधी
शासन आपल्या द्वारी या योजने अंतर्गत पंढरपूर नगरपरिषदेच्या दीनदयाळ अंत्योदय योजना -राष्ट्रीय नागरी अभियान या योजनेअंतर्गत स्थापित ४ महिला बचत गटांना फिरता निधी देण्यात आला यामध्ये
१) मनस्वी महिला स्वयंसहाय्यता बचत गट:- ज्योती ननवरे, कोमल नवले
२)नारायणी महिला स्वयंसहाय्यता बचत गट :-गीता गंगाधरे, दीपाली चौगुले
३)आरुषी महिला स्वयंसहाय्यता बचत गट:- छाया देशमुख,इंदू पोतदार
४)मनस्वी महिला स्वयंसहाय्यता बचत गट :-देविका धोत्रे, दीपाली कांबळे या
गटांना प्रत्येकी दहा हजार रुपये असे एकूण ४० हजार रुपयांचा निधीचे वाटप मुख्याधिकारी श्री.अरविंद माळी यांच्या शुभहस्ते देण्यात आले तसेच प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजना पी एम स्वनिधी योजनेअंतर्गत प्रथम टप्प्यातील दहा हजार रुपये 3 पथविक्रेते
1)जुबेर शेख
2)कादर बागवान
3)अर्चना सुरवसे यांना हे पात्र झाले आहेत.
प्रथम कर्ज परतफेड केल्यानंतर द्वितीय वीस हजार प्राप्त होते, तृतीय टप्प्यातील पन्नास हजार श्री. थक्कपा गवळी यांना देण्यात आले, यावेळी बोलताना मुख्याधिकारी श्री.अरविंद माळी यांनी सांगितले की सदरील अभियानांतर्गत लाभार्थ्यांना कुठलाही त्रास होऊ न देता सुलभरित्या लाभार्थ्यांना वेळेत योजनेचा लाभ देण्यात आला आहे असल्याचे सांगितले
या कार्यक्रमास उपमुख्याधिकरी सुनील वाळूजकर, दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे व्यवस्थापक योगेश काळे, संतोष कसबे, समूह संघटक सचिन सरवदे, विठाई लोकसंचालित साधन केंद्र यांच्या व्यवस्थापक वंदना बिडकर हे उपस्थित होते