पंढरपूर प्रतिनिधी
अभिजीत (आबा) पाटील चेअरमन, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना, वेणूनगर, पंढरपूर यांनी रयत शिक्षण संस्थेच्या, मध्य विभाग, बुद्धिमान विद्यार्थी उन्हाळी वर्ग प्रकल्प यशवंत विद्यालय,पंढरपूर येथे येऊन सदिच्छा भेट दिली.
अभिजित पाटील आबांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने मोलाचे मार्गदर्शन केले. आबांनी बोलताना विविध उदाहरणे देत असताना इच्छा शक्तीच्या जोरावर आपण काहीही करू शकतो. नोकरीच्या मागे न लागता विद्यार्थ्यांनी इतरांना नोकरी देण्यासाठी आपण स्वतःच उद्योजक व्हावे.असे आव्हान प्रकल्पतील सर्व विद्यार्थ्यांना केले.
विध्यार्थ्यांशी हितगुज साधले, व भावी काळात आपल्याला गरज भासल्यास आपला एक मोठा भाऊ या नात्याने आपण माझ्याशी संपर्क करावा, असे आव्हान अभिजीत पाटील यांनी केले.प्रकल्पास शुभेच्छा दिल्या,कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.श्री. सुशील शिंदे सर यांनी केले, तथा श्री.जरे सर यांनी वेळात वेळ काढून आपण प्रकल्पास भेट दिली,त्याबद्दल त्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे मा.लाईफ वर्कर श्री.पवार सर, सोनलकर सर, जाधव के. के. सर, दडस सर ,श्रीमती व्यवहारे मॅडम,वरिष्ठ लेखनिक गोंजारी, संजय शिंदे आणि मित्र समूह आदी सर्व सेवक,विद्यार्थी उपस्थित होते.