*चला जाऊ या, बालुडयाच्यां नगरी*
*बाल गीत-गाणी*
(५)
--------------------------------
माझा दोष नाही.....
बाई, बाई , बाई, आज अभ्यास केला नाही
पण खरं खरं सांगतो, याच्यात माझा दोष नाही
शाळा सुटली कि जातो घरी, फेकतो मग दप्तराचे ओझे
लगबगीने मैदानावर जातो, मग सुरु होते खेळणे माझे
अभ्यासाला बस म्हणुन हाका मारते आई
खरेतर मैदानातुन माझा पायच निघत नाही
घरात पाय कि दारात पाय, आई म्हणते अभ्यास कर
त्यासाठी मग शोधतो दप्तर, पण ते नाही सापडत लवकर
आईच मग देते शोधुन , दप्तर माझे झटपट
उघडुन बसतो दप्तर अनं मग अभ्यासाशी खटपट
विश्वास बसणार नाही बाई, पण खरचं सांगतो शपथ
आधी मी, आधी माझा अभ्यास, म्हणत विषय बसतात भांडत
गणित तर महाअवघड कसला कोडयात बोलतो
सदा न कदा, इतिहास दादा, सणावळया खोलतो
इंग्रजी भाऊची दादागिरी, दफ्तर भर चालते
नागरिक शास्र गरिब बिच्चारे, इतिहासामागे चालते
भुगोल म्हंणजे भिरभिर वारे, डोंगर आणि दरे
समजत नाही असे कसे, वाहतात खारे वारे
मराठीचा तर मोठा तोरा, शुद्ध व्याकरण, व्याकरण
हिंदी मध्ये गडबड गुंडा, कसे करावे संभाषण ?
सगळे विषय, मी,मी करत, फेर घालु लागतात
अभ्यासाचा माझा मात्र बट्ट्याबोळ करतात
म्हणुन खरं, खरं सांगतो बाई
आज अभ्यास केला नाही, याच्यात माझा दोष नाही. ...
याच्यात माझा दोष नाही.
---------
रचनाकार कवी नवनाथ मामा
*नवनाथ अर्जुन पा गायकर*
*आहुर्ली,पो.सांजेगाव,ता.ईगतपुरी, जि.नाशिक**४२२ ४०२*
*मो.नं. ९८८१३२९७०९,९७६३८२७७०८*
*ईमेल-9nathgaikar@gmail.com*
( *आपल्याला बाल गीत-गाणी कशी वाटली हे अवश्य कळवा. आम्ही आपल्या प्रतिक्रियाचीं नक्की वाट पाहु....*
चित्र काढून सुंदर रंगवा