पंढरपूर प्रतिनिधी
तपकिरी शेटफळ ता. पंढरपूर येथील ग्रामसेवक के. एच नवले यांनी कामात कसूर केल्याबद्दल व पदाचा गैरवापर करुन अर्वाच्य भाषा वापरल्याबद्दल त्यांच्या निलंबनाची कारवाई करणे बाबत निवेदन देण्यात आले आहे.
उपरोक्त विषयान्वये वंचित बहूजन युवा आघाडी पंढरपूर तालुकेच्या वतीने निवेदन की मौजे तपकिरी शेटफळ ता. पंढरपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात वंचित बहूजन युवा आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते गावातील अनागोंदी कारभारा विषयीचे निवेदन देण्याकरीता गेले असता. ग्रामसेवक के. एच. नवले यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना अर्वाच्य भाषा वापरली. तुम्हाला काही काम धंदा आहे की नाही? तुम्ही कार्यालयात येवू नका मी तुमचे निवेदन स्विकारणार नाही, निवेदन देण्याचा प्रयत्न केला तर निवेदन फाडून टाकेन अशी भाषा वापरली. सदरची भाषा ही उर्मटपणाची आहे.
सदर ग्रामसेवक हे गावी कधीतरी येतात. ते महिना, पंधरा दिवसातून गावी येतात. त्यांना गावातील लोकांच्या अडीअडचणीचे काहीही देणे घेणे नाही. तसेच कार्यालयीन कर्मचारी बाबू सरगर हे गावातील जनतेला उर्मटपणाची वागणूक देतात. कार्यालयीन कर्मचारी बाबू सरगर हे स्वतः ला लिपीक म्हणवून घेत असून ते ग्रामसेवक यांच्या अनुपस्थितीत कार्यालयीन दप्तराची हाताळणी करतात. त्यांची नेमणूक कोणत्या पदावर आहे याची चौकशी व्हावी.
पक्षाचे निवेदन घेण्यास ग्रामसेवक तयार नाहीत उलट अर्वाच्य भाषा वापरातात. जर पक्षाच्या पदाधिकारी यांना अशी वागणूक देत असतील तर सामान्य लोकांच काय ? निवेदन फाडून टाकेन अशी भाषा वापरणा-या मुजोर ग्रामसेवकास पदावरुन तात्काळ निलंबीत करावे.
सदर के. एच. नवले ग्रामसेवकावर कामात कसूर केल्याबद्दल व पदाचा गैरवापर करुन दमदाटी केल्याबद्दल त्यांची खातेनिहाय चौकशी करुन तात्काळ निलंबन करण्यात यावे. तसेच लोकांच्या कामात अडसर निर्माण करणा-या बाबू सरगर यांना कामावरुन कमी करुन लोकांना होणारा त्रास कमी करावा व दोन्ही व्यक्तिवर शिस्तभंगाची कायदेशीर कारवाई दि. ०१/०६/२०२३ पर्यंत न केल्यास दि. ०२/०६/२०२३ रोजी पंचायत समिती, पंढरपूर समोर आंदोलन करण्यात येईल, याची दखल घेण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे.