सोलापूर प्रतिनिधी
एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या जनरल सायन्स व इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने 'एबस्ट्रॅक्ट अप्लाईड अँड कॉम्पुटेशनल मॅथेमॅटिक्स या विषयावरील राष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न झाली.
संशोधक विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी, व गणिताचा व्यावहारिक वापर याबद्दल सखोल मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या गणित विभागप्रमुख डॉ. सरिता ठकार ,पुणे विद्यापीठाच्या गणित विभागातील प्रा. डॉ. एस. डी केंद्रे ,हैदराबाद च्या केंद्रीय विद्यापीठाचे डॉ. एस. बी. बल्लाळ, सोलापूर विद्यापीठातील कॉम्पुटेशनल सायन्स चे विभागप्रमुख डॉ. व्ही. बी. घुटे, डॉ. प्राचार्य. डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. आर. टी. व्यवहारे, समन्वयक डॉ. विनोद खरात उपस्थित होते. या राष्ट्रीय परिषदेत संपूर्ण देशातून एकूण ९० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तर सुमारे ३० विद्यार्थ्यांनी आपले संशोधनपर लेख सादर केले. राष्ट्रीय परिषदेचे समन्वयक डॉ. विनोद खरात यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ.शंकर नवले यांनी स्वागतपर भाषण केले.
अध्यक्षीय मनोगतात डॉ.सरिता ठकार यांनी गणित विषयात संशोधनाचे महत्व, त्याचा व्यावहारिक वापर यावर भर दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भावना श्रीवास्तव यांनी केले.
ही राष्ट्रीय परिषद यशस्वी करण्यासाठी सहसमन्वयक प्रा.मन्सूरअली काझी, प्रा. सविता कोंडा,डॉ. इम्रान चंदरकी,डॉ.सुवर्णा क्षीरसागर प्रा.भावना श्रीवास्तव प्रा.अमित कांबळे, प्रा. रवींद्र देशमुख यांनी परिश्रम घेतले.
सदर राष्ट्रीय परिषदेत दयानंद शास्त्र महाविद्यालयाच्या गणित विषयाच्या ३१ पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला.७ विद्यार्थ्यांनी आपले संशोधनपर लेख सादर केले. मान्यवरांनी या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.