सोलापूर प्रतिनिधी
केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात 'बौद्धिक मालमत्ता ' या विषयावर विद्युत अभियांत्रिकी विभागातील मुलांसाठी व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.शशीकांत हिप्परगी यांनी मुलांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांनी नोकरी मिळवण्याच्या धडपडीपेक्षा ते स्वतः चे बिझनेस कसे घडवू शकतात, त्यासाठी लागणारे ट्रेड मार्क निवड, निर्मिती इत्यादी व त्याचे कॉपीराइट करून त्यावरील हक्काची नोंद कशी केली गेली पाहिजे आणि त्याचा निसर्गाशी समन्वय लावून कशी एखादी कल्पना प्रोजेक्ट मधून साकार करून त्याचा प्रोडक्ट बाजारात विकला जायीपर्यंतच्या काळातील खर्च यासाठी त्यांच्या सक्षय याचा प्रारंभ कसा झाला आणि त्यासाठी आलेल्या अडचणी त्या दूर कशा करण्याचा प्रवास त्यांनी मुलांना नवीन व्यक्तींना प्राधान्य देण्यासाठी सांगितल्या.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले,उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे व डॉ. शेखर जगदे , आय. आय. सी. अध्यक्ष प्रा. श्रीकांत जगताप, प्रा. अनिल कोठमाळे, प्रा. सुप्रिया कुलकर्णी, प्रा. राजकुमार लांडगे, प्रा. बालाजी बेद्रे, प्रा. अभिमन्यू भिसे, प्रा. शिंदे व यशवंत बडेकर आदी उपस्थित होते.