सोलापूर प्रतिनिधी
लायन्स क्लब आॕफ सोलापूर ट्विन सिटी च्या वतीने क्लबच्या माजी अध्यक्षा व ज्येष्ठ लायन ममता बुगडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुगडे परिवाराच्या वतीने रेणुका माता महिला शासकीय वसतिगृह येथे तेथील महिलांना रुचकर असे श्रीखंड, पुरी, बटाट्याची भाजी, मसाला भात, कोशिंबीर इत्यादी पोस्टीक जेवण देऊण वाढदिवस साजरा करण्यात आले.
यावेळी क्लब अध्यक्ष अभियंता सागर पुकाळे ज्येष्ठ लायन नागेश बुगडे रेणुका माता वसतिगृहाच्या व्यवस्थापिका सौ अश्विनी शिंगे यांच्यासह तेथील स्टाफ उपस्थित होते.