सोलापूर प्रतिनिधी
बोरामणी-दक्षिण सोलापूर तालुक्यातील एस व्ही सी एस हायस्कूल,बोरामणी येथे आरक्षणाचे जनक,थोर समाजसुधारक, लोकराजा राजर्षी शाहू महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मा पर्यवेक्षक श्री शिवप्पा बिराजदार सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मठाचे सदभक्त श्री वसंत आवटे हे होते. सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
तद्नंतर प्रशालेतील विद्यार्थी चि मोईब नदाफ, कु साक्षी रोकडे, कु सानिका हंगरगे, कु भक्ती जवळे,कु अंजली स्वामी यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. यावेळी प्रशालेतील इ 5 वी ते इ 9 वी पर्यंतच्या सर्व वर्गांचा वार्षिक निकालाचा गोषवारा सांगण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बिराजदार सरांनी आपल्या मनोगतात राजर्षी शाहू महाराजांनी स्वातंत्र्यपूर्व काळात केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याविषयी माहिती दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे मा मुख्याध्यापक श्री राम ढाले सरांनी मार्गदर्शन केले. तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सुलोचना विजापुरे मॅडम यांनी केले.