अकलूज प्रतिनिधी
डॉ.स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील यांना शांततेचा नोबेल पुस्कारा करीता स्वीडन व नॉर्वेच्या समितीकडून नामांकन मिळाले आहे. याशिवाय निसर्ग संरक्षक व मानद डॉक्टरेट पदवीनेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांच्या या अतुलनिय कामगिरीबद्दल डॉ.स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील नागरी सत्कार समितीच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा स्मृती भवन येथे राम जन्मभूमी तिर्थ क्षेत्र आयोध्याचे कोषाध्यक्ष व न्यासी श्री कृष्ण जन्मभूमी न्यास, मथुरा चे उपाध्यक्ष स्वामी श्री. गोविन्ददेव गिरी महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी उपमुख्यमंत्री मा.श्री.विजयसिंह मोहिते पाटील तसेच यावेळी सौ.नंदिनीदेवी मोहिते पाटील, मा.श्री.जयसिंह मोहिते पाटील, मा.श्री.मदनसिंह मोहिते पाटील, आमदार मा.राम सातपुते, विश्वशांती दुत डॉ.सुधीर तारे,देहू संस्थान चे अध्यक्ष ह.भ.प. बापूसाहेब देहूकर, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टचे चंद्रकांत सहासने तसेच मोहिते पाटील परिवारातील सर्व सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ व इतर मान्यवर उपस्थित होते.