मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दीमध्ये दि. 18/05/2023 रोजी अमावस्या असलेने रात्री 22/00 ते दि. 19/052023 रोजी पहाटे 05/00 वा पर्यंत ऑल आउट ऑपरेशन दरम्यान मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागात आरोपी चेक करणे, अवैद्य अग्निशस्त्रे बाळगणारे इसमाचा शोध घेणेकरिता पेट्रोलिंग करत असताना एक इसम मंगळवेढा शहरातील मंगळवेढा मार्केट यार्ड मधील मोकळ्या जागेत लिंबाच्या झाडाच्या आडोशाला मिळुन आला असता पोलीसांनी सदर इसमास ताब्यात घेवून त्याचे जवळील एक लोखंडी कोयता व लाकडी मुठ असलेली सुरी जप्त केली आहे. सदर प्रकरणात अधिक चौकशी करता त्या इसमाचे नाव विशाल उर्फ भैय्या अरुण हजारे वय 22 वर्ष रा. हजारे गल्ली मंगळवेढा ता. मंगळवेढा आहे.
सदर व्यक्तीस पोलीसांनी अटक केली आहे. तसेच त्याचे ताब्यातील एक लोखंडी कोयता व लाकडी मुठ असलेली सुरी जप्त करून सदर इसमाविरोधात मंगळवेढा पोलीस ठाणे मध्ये गु.र.नं. 410/2023 महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम 135, भारतीय हत्यार कायदा कलम 4. 25 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, सोलापुर ग्रामीण, अप्पर पोलीस अधिक्षक हिंमतराव जाधव, राजश्री पाटील मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळेवढा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने मंगळवेढा पोलीस ठाणे.पो.हे.काँ / दयानंद हेबांडे, पोहेकॉ हजरत पठाण, पोकों / अजित मिसाळ, पोकों/सुरज देशमुख यांनी सदर गुन्ह्याचे तपास कामी मदत केली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोना / तळवार, मंगळवेढा पोलीस ठाणे हे करीत आहेत.