पंढरपूर प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार यांनी समितीची निर्णय मान्य करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद कायम ठेवल्याने सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांचेसह पदाधिकाऱ्यांनी साखर वाटून, फटाक्यांची आतिषबाजी करुन आनंदोत्सव साजरा केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याचा खा.शरदचंद्रजी पवार यांनी घेतलेला निर्णय माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढविणारा आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाचे पदाधिकारी व सर्व समान्य कार्यकर्त्यांना ताकद मिळणार असून महाविकास आघाडीला एकजुटीला बळ देणारा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांनी व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादी उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश दादा फाटे, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळूंखे, प्राथमिक शिक्षक संघाचे सल्लागार बाळासाहेब काळे, सहकार शिरोमणीचे संचालक राजसिंह माने, अर्जुन जाधव, अनिल नागटिळक, निलेश शेंडगे, धनाजी कवडे, सचिन बोडके, बंडू पवार यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.

