पुणे प्रतिनिधी
श्री छत्रपती शिवशंभु जन्मोत्सव समिती धनकवडी गाव आयोजित धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जन्मोत्सव मोठ्या संख्येने उत्साहात थाटा माटात साजरा करण्यात आला.
सर्व नागरिकांनी पालखी मिरवणूक सोहळ्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन मिरवणूक सामील होऊन पालखी मिरवणुकीची शोभा वाढवली.
एक गाव एक उत्सव अशी संकल्पना मनात ठेवून समितीने 72 गणेश मंडळ सर्व हिंदुत्ववादी संघटना , सर्व पक्षीय, सोसायटी , ग्रुप अश्या सर्वांना एकत्र करून एकाच नावाखाली पालखी मिरवणूक सोहळा पार पाडला.
या मिरवणुकीत संभाजी महाराजांची भव्यदिव्य 10 फुटी मूर्ती आकर्षण होती व स्टेज वर महाराजांच्या वेषभुषेत संतोष सोनवणे हे शेवट पर्यंत उभे होते याच बरोबर पालखी सोबत आरती म्हणणारे संभळ वाले यांचा ग्रुप , हलगी पथक , शंखनाद ढोलताशा पथक , बँड व पालखी सोबत लायटिंग असलेल्या छत्री , लहान मुलांचा मर्दानी खेळ पथक , अश्या सर्वांचा सामावेश असल्याने आगळी वेगळी अशी पालखी मिरवणुकीला शोभा आली.
पालखी मिरवणूकीची सुरुवात महिलांच्या हस्ते आरती करून मिरवणुकीला सुरुवात झाली.
समितीचे सर्वच सदस्यांनी मिरवणुकीचे आयोजन चांगल्याप्रकारे केले पालखी मिरवणूक ही चैतन्य नगर येथून धनकवडी बस स्टॉप ते पालखी मार्ग सावरकर चौक ते दत्तमंदिर शेवट जानुबाई मंदिर येथे देवीची आरती म्हणून मिरवणूक पार पाडली.