कल्याण प्रतिनिधी- गुरुनाथ तिरपणकर
ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघाच्या दरवर्षीप्रमाणे राज्यस्तरीय वृत्तपत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे,इच्छुक वृत्तपत्र लेखकांनी १जानेवारी २०२२ ते ३१डिसेंबर २०२२या कालावधीतील उत्कृष्ट पत्रांच्या दोन झॅरोक्स प्रती दिनांक १५जून २०२३पर्यंत पोहोचतील अशा बेताने अध्यक्ष-अरविंद म्हात्रे,सुंदराबाई बंगला,दत्त मंदिर रोड,गौरीपाडा,बिर्ला काॅलेज मागे,कल्याण(पश्चिम)पिन-४२१३०१या पत्यावर पाठवाव्यात.असे आवाहन संघातर्फे करण्यात आले आहे.
असे संघाचे सरचिटणीस सुनिल इंगळे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.अधिक माहितीसाठी अरविंद म्हात्रे-९०८२५४३२३२आणि सुनिल इंगळे-९०९६९४९०२९ यांच्याशी संपर्क साधावा.