पंढरपूर प्रतिनिधी
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ, पंढरपूर संचलित,श्री.दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय सुस्तेचे प्राचार्य अशोक मसू बनसोडे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्याने प्रशालेतर्फे त्यांचा सत्कार प्रशालेचे पर्यवेक्षक आर.डी शिनगारे व प्रशालेचे जेष्ठ लेखनिक आर.डी ढगे यांच्या हस्ते करण्यात आला.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यामध्ये मिसळून अधिकार वाणी न गाजवता, आनंदी वातावरणात व समन्वयाने प्रशालेची कर्तव्ये व कार्ये पार पाडल्याचे आर.एम जाधव यांनी सांगितले.
सत्कारास उत्तर देताना प्राचार्य बनसोडे म्हणाले की, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत शिक्षकच असेन.आपण सर्वांनी विद्यार्थी घडवणे हे ध्येय नजरेसमोर ठेवून वाटचाल केली पाहिजे.शिक्षक असो वा सर्व माणसं ती सर्व आजन्म विद्यार्थी असतात तसाच मीही आजन्म विद्यार्थीच आहे.एक विद्यार्थी प्रिय शिक्षक असल्याने मला समाधान आहे.
कार्यक्रमासाठी प्रशालेचे सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.