सांगोला प्रतिनिधी
कसबा पेठ पुणे मतदार संघाचे आमदार रवींद्र भाऊ धंगेकर यांचा सांगोला तालुका लोणारी समाजाच्या वतीने रविवारी सांगोल्यात सपत्नीक सत्कार करण्यात आला.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते नवनिर्वाचित आमदार रवींद्र भाऊ धंगेकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आम नाना पटोले, मा. आमदार दीपक आबा साळुंखे पाटील मा.आमदार रामहरी रुपनर, स्वागताध्यक्ष बाबा करांडे ,पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख ,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, प्रा.पी.सी झपके सर, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष जयमाला ताई गायकवाड, प्रतिभा धंगेकर, अभिजीत पाटील, आदि मान्यवर उपस्थित होते.