पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सामूहिक हनुमान चालीसा पठणाचे विविध ठिकाणी पठण करण्यात आले.
त्यापैकी महाद्वार येथील सुप्रसिद्ध जागृत श्री अकरा रुद्र मारुती मंदिर येथे सामूहिक हनुमान चालीसाचे पठण करून तेथील पुजारी रत्नाकर ज्ञानेश्वर गुरव यांनी मंदिरातर्फे हनुमान चालीसा स्तोत्र (पोथी) चे वाटप केले त्यावेळी रविंद्रजी साळे - (विश्व हिंदु परिषद समरस्ता आयाम ) , वालचंद जी जामदार गुजराथी - (विश्व हिंदू परिषद मठ मंदिरे जिल्हा संपर्कप्रमुख) , संतोषजी पापरीकर - (विश्व हिंदू परिषद मठमंदिरे जिल्हा सह संपर्कप्रमुख), गंगाधरजी कोळी - (विश्व हिंदू परिषद सेवा आयाम), कृष्णा जामदार गुजराथी , अॅड.आकाश कोळी तसेच अनेक श्रीराम भक्त व श्री हनुमान भक्त यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच पंढरपुरातील मल्लिकार्जुन महादेव मंदिर , गोपाळकृष्ण मंदिर, ह.भ.प.जोगदंड महाराज वारकरी संस्था, ह.भ.प.सचिदानंद कुलकर्णी (माऊली गुरुकुल इसबावी) , ह.भ.प.जय महाराज (बालयोगी मठ), ओंकार वैद्य (दत्त घाट) आणि बोहाळी येथील ग्रामपंचायत मेंबर व प्रगतशील बागायतदार संतोष शिंदे यांच्या सहकार्याने श्री सिध्देश्वर प्रासादिक भजनी मंडळ (पुजारी कुणाल गुरव) यांच्या वतीने उत्स्फूर्तपणे हनुमान चालीसाचे ध्वनिक्षेपकावर सामूहिक पठण करण्यात आले.