अनेक मान्यवरांची हजेरी सेवा सन्मान पुरस्काराचे वितरण
सांगोला प्रतिनिधी
पत्रकारिता एक वसा ध्यास समजून सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी आपली खरीखुरी पत्रकारिता पणाला लावून सर्वसामान्य माणसांचे प्रश्न प्रशासन दरबारात मांडून त्यांना न्याय देण्याची भूमिका पार पाडणारे सोलापूर जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक घडामोडीवर बारीक नजर ठेवून वृत्तपत्र केवळ व्यवसाय नसून सेवा म्हणून गेली पाच वर्षापासून अविरतपणे दैनिक तुफान क्रांतीची दमदार वाटचाल सुरू असून वृत्तपत्र मधील स्पर्धांमध्ये आजही आपलं स्थान आढळ ठेवल असून सडेतोड बातम्या परखड लेखन उत्कृष्ट मांडणी वंचित पीडित अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी दैनिक तुफान क्रांतीने महत्वाची भूमिका बजावली आहे सांगोला येथील मुक्ताई रिसॉर्ट मध्ये दैनिक तुफान क्रांती चा पाचवा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार होते सदर वर्धापन दिनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी संपादक मिर्झा गालिब मुजावर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या कार्यक्रमाचे ने अभिनेता भीमसेन चव्हाण उपस्थित होते या वर्धापन दिनानिमित्त समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध लोकांना दैनिक तुफान क्रांती च्या वतीने सन्मानपत्र सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले
*जनसामान्य माणसाचा बुलंद आवाज दैनिक तुफान क्रांती* यशवंत पवार
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील दैनिक तुफान क्रांती या वृत्तपत्राच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचे प्रश्न प्रशासन दरबारात मांडून त्यांना न्याय देण्याची भूमिका नेहमीच पार पडली असून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून दैनिक तुफान क्रांतीची आजवरची वाटचाल अतिशय दमदार आहे दैनिक तुफान क्रांती च्या वतीने वंचित पीडित घटकाला नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न केला असून दैनिक तुफान क्रांती हे जनसामान्य माणसाचे बुलंद आवाज म्हणून ओळखलं जात असल्याचं प्रतिपादन पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी दैनिक तुफान क्रांती च्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त मत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या आहेत या कार्यक्रमास पत्रकार सुरक्षा समितीचे फलटण तालुका अध्यक्ष विक्रम वाघमारे मनोज गायकवाड जनता संघर्ष न्यूज चे संपादक सिद्धार्थ भडकुंबे अनिरुद्ध गायकवाड उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दैनिक तुफान क्रांतीचे उपसंपादक जावेद आत्तार यांनी विशेष परिश्रम घेतले. या वर्धापन दिनास अनेक मान्यवरानी शुभेच्छा दिल्या आहेत.