पुणे प्रतिनिधी
दिनांक ३ एप्रिल २०२३ सोमवार रोजी नामदेव समाजोन्नती परिषदेच्या ११६ व्या वर्धापन दिन मघ्यवर्ती कार्यालय पुणे याठिकाणी उत्साहात आनंदाने मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी नवनिर्वाचित आमदार मा.श्री.रविंद्र भाऊ धंगेकर हे उपस्थित होते त्यांचा सत्कार पुणेरी पगडी, शाल व फळांची भेट देऊन मा.संजीव तुपसाखरे, डॉ अजय फुटाणे व मा.संजय नेवासकर ह्यांच्या हस्ते यथोचित सत्कार केला याप्रसंगी समाजाच्या नामदेव स्मारकासाठीच्या प्रकल्पासाठी लक्ष देण्याची मागणी करण्यात आली.
याचे सुत्र संचलन श्री.संदिप लचके यांनी केले, या कार्यक्रमासाठी मा.स्मिताताई वस्ते, मा.तात्या मेटे, मा.राजाभाऊ पोरे, मा.बाप्पूसाहेब बोत्रे, मा.कैलास नेवासकर, डॉ संदिप खुर्द , मा.बाळासाहेब आंबेकर , मा.अजित रेळेकर साहेब, श्री व सौ.रवीशेठ रहाणे, मा.अजिंक्य शिंदे, मा.मोहन गाढवे, मा.एकनाथ सदावर्ते, मा.सुरेश कुमठेकर, मा.उषाताई पोरे अनेक पुणे पिंपरी चिंचवड भागातील, संस्थेचे पदाधिकारी व सन्मानीय समाज बांधव आवर्जुन उपस्थित होते. हा कार्यक्रम समाज बांधवाचा ऋणानुबंध जोडण्यासाठी केले होता त्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले समाज एकसंध व बंधुभाव वाढीला लागत आहे हे नक्कीच.
याकार्यात श्री व सौ संजय नेवासकर परिवार ,डॉ अजय फुटाणे, श्री वसंतराव खुर्द ,श्री महेश बागडे ,श्री रोहित यवतकर ,श्री व सौ दिगंबर क्षीरसागर यांनी विशेष परिश्रम घेतल्यामुळे हा कार्यक्रम छान पार पडला. याप्रसंगी दुर्गेश खुर्द यांनी नेत्र दिपक विद्युत रोषनाई केलेली होती.
कार्यालयाचे छान नुतनीकरण केलेले असल्यामुळे श्री सत्यनारायण महापुजेचे आजोजन केले होते,श्री सत्यनारायण महापुजा श्री व सौ कुंदन गोरटे यांच्या हस्ते करण्यात आली.
याप्रसंगी ३०० पेक्षा जास्त समाज बांधवांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला सर्व समाज बांधवाचे नामदेव समाजोन्नती परिषदेच्या वतीने मनापासून आभार, असेच प्रेम द्विगुणीत करून समाज बळकट व्हावा ही सदिच्छा.