सोलापूर प्रतिनिधी
केगांव येथील एन.बी.नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात 'डीस्टा 2के23' नॅशनल लेव्हल टेक्निकल इव्हेंट संपन्न झाला.या कार्यक्रमाचे उद्घघाटन प्रमुख पाहुणे रवींद्र जगताप जनरल मॅनेजर , डूरॉक्रेट इंजिनीअरिंग सर्व्हिस प्रा. ली.पुणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.रवींद्र व्यवहारे व डॉ.शेखर जगदे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुमेध पाठक यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाची प्रस्तावना सांगितली व त्यानंतर मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
प्रमूख पाहुणे रवींद्र जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अभियांत्रिकी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, रोजगार उपलब्ध करण्यासाठी लागणारे कौशल्य व यशस्वी कारकिर्दीसाठी आवश्यक असणारे अंगभूत गुण याबद्दल त्यांनी माहिती सांगितली. या विद्यार्थ्यांनी डीस्टा 2के23 मध्ये कॅडवार, क्विझ, ट्रेझर हंट, ब्रेन बझ्झेर,टेक्नोव्हेशन आयडिया, प्रेझेंटेशन, टेक बझ , हग्ज फॉर बग्ज, व्हेलोरंट, आयडिया शोडाऊन, सर्किट डेबगिंग, मिनी रेडीओस या विविध स्पर्धेमधून एकूण 400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानिया हकीम, अपूर्व एडके तर या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डॉ. एस. एस. शिरगण यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्टूडेंट कौन्सिलचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले.