सोलापूर प्रतिनिधी
दक्षिण सोलापूरचे आमदार व माजी सहकारमंत्री सुभाष बापू देशमुखांनी एका कार्यक्रमात राज्याचे गृहमंत्री व बापूचे नेते देवेद्र फडणवीस हे महिलांवर प्रचंड फिदा आहेत, असे महिलांबद्दल अपमान कारक असा शब्द वापरुन आपल्या नेत्याचा गौरव करण्याचा प्रयत्न केला. हे अत्यंत निंदाजनक आणि नारी जातिला अपमान करण्याचे प्रयत्न केला आहे. याबद्दल बापुनी महिलांची माफी मागावी अन्यथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महिलांचा अपमान केल्या बद्दल गुन्हा दाखल करण्यात येऊन आंदोलन करण्यात येईल असा ईशारा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
आमदार सुभाष देशमुख यांनी कोण कोणावर फिदा आहे. ते सांगण्यापेक्षा जीवनावश्यक वस्तुंची झालेली महागाई याबाबत बोलावे सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून आपणच केलेल्या गटबाजीमुळे सोलापूर भकास झाले आहे याबद्दल बोलावे, सोलापूरचे बीडी यंत्रमाग व असंघटित कामगार देशोधडी लागला आहे त्यांच्या विकासाबद्दल बोलावे. महिलांना पर्यायी उद्योगाबद्दल सुरु केलेल्या गारमेंट उद्योग केठे गेला! त्या बद्दल बोला. त्या मतदार संघात म्हणजे दक्षिण सोलापूर मतदार संघाचे आपण प्रतिनिधीत्व करता त्या मतदार संघाचे काय विकास केले त्याबद्दल बोलावे. महाराष्ट्र गद्दारांच्या साथीने सरकार बनवून ज्याने गृहमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून मिळवत आहेत असे आपले नेते देवेंद्र फडणवीस हे आणखी कशा कशावर फिदा आहेत याबद्दल बोलावे. ते सोडून महिलांबद्दल असे अपमानित शब्द वापरून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणे कितपत योग्य आहे. हे आपणास जाणीव असणे गरजेचे आहे.
एक लोकप्रतिनिधी बरोबर आपण लोकमंगल चे प्रमुख आहात असे मंगल बोलू नका. अन्यथा अनर्थ होईल. याची नोंद घ्या असाही सल्ला शहरप्रमुख कारमपुरी (महाराज) यांनी आमदार सुभाष देशमुख यांना दिला. आणि आपण गुन्हा दाखल करण्याचे हे मात्र निश्चित आहे.