अकलूज प्रतिनिधी
आज दिनांक ६ /४ /2023 भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवस व हनुमान जयंती चा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुख्तार भाई कोरबू यांच्या कार्यालयात अकलूज येथे करण्यात आले.
त्यावेळी पंडित दीनदयाल उपाध्याय, भारताचे माझे पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुढील कार्यक्रम साजरा करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष मुख्तार भाई कोरबू, ओबीसी मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे, अकलूज भाजपचे अध्यक्ष महादेवजी कावळे, युवा मोर्चाचे डॉक्टर सेल अक्षय वायकर, सुभाषजी गोसावी, बाळासाहेब लोखंडे, सर्पमित्र व जय शंकर प्रतिष्ठान चे अध्यक्ष राहुल गायकवाड यश शिंदे तसेच भाजपचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.