तुंगत प्रतिनिधी
दि.२८ मार्च २०२३ रोजी सांगोला महाविद्यालय सांगोला येथे किरणअकॅडमी, पुणे या कंपनीचा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह पार पडला. या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये सांगोला महाविद्यालयाच्या संगणक विभागातील सात विद्यार्थ्यांची निवड झाली, असुन यामध्ये तुंगत येथील कु. ॠतुजा धनाजी रणदिवे हिची निवड झाल्याने पंढरपूर येथील सु. रा.परिचारक पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश पाटील, यांचेसह परीसरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.
यासंदर्भात माहिती देताना सांगोला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले म्हणाले, किरण अकॅडमी, पुणे ही पुणे येथील सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देणारी एक नामांकित कंपनी आहे. सदर कंपनीत निवड झालेले विद्यार्थी हे बी.एस्सी. (ई.सी.एस.) व बी.सी.ए. च्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहेत. चालू शैक्षणिक वर्षात या अगोदरही वेगवेगळ्या नामांकित कंपन्यात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.सांगोला महाविद्यालय संगणक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे महाराष्ट्रातील एक अग्रेसर महाविद्यालय आहे. सदर कंपनीत निवड झालेले विद्यार्थ्यी कु.भुसे प्रतीक्षा प्रभाकर , कू दिवसे ऋतुजा दत्तात्रय, कु. रणदिवे ऋतुजा धनाजी, श्री. सुरवसे रोहन राजू, श्री. घाडगे विवेक अशोक, कु. जाधव स्वप्नाली शिवाजी, श्री. गाडेकर प्रकाश महादेव हे आहेत.
प्लेसमेंट ड्राईव्ह प्रक्रिया पार पाडण्यासाठी कंपनीच्या वतीने श्री. पंकज येरपुडे (ऑपरेशन हेड), श्री अण्णासाहेब भोसले ( मार्केटिंग हेड) हे उपस्थित होते. संपूर्ण कॅम्पस निवडीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी संगणक विभागप्रमुख प्रा. राजकुमार ताठे, प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. सूर्यकांत पाटील, प्रा विशाल कुलकर्णी, प्रा. कृष्णा पवार, प्रा. गणेश पैलवान, प्रा. सुभाष पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
महाविद्यालयाच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष तात्यासाहेब केदार व प्रा.पी.सी. झपके, खजिनदार नागेश गुळमिरे सचिव म.सि.झिरपे, सहसचिव साहेबराव ढेकळे व इतर संस्था पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे अभिनंदन केले.