वाडी कुरोली प्रतिनिधी
निर्मलग्राम ग्रामपंचायत वाडीकुरोलीच्या सरपंचपदी लाडाबाई लव्हाजी काळे यांची बिनविरोध निवड झालेबद्दल त्यांचा सत्कार काळे परिवाराकडून राष्ट्रवादी काँग्रेस नेते, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.संगिताताई काळे, मातोश्री मालनबाई काळे यांचे शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी मा.उपसरपंच नाना काळे,भास्कर काळे,रघुनाथ चव्हाण उपस्थित होते.
यावेळी कल्याणराव काळे यांनी नूतन सरपंच यांना गावाच्या विकासाकरिता शुभेच्छा दिल्या.
यावेळी सरपंच काळे म्हणाल्या,आमचे मार्गदर्शक,नेते कल्याणराव काळे यांच्या मार्गद्शनाखाली मी व माझे सहकारी सदस्य शासनाच्या विविध योजना,विकासकामे मंजूर करून गावाचा विकास करणार आहे.याकरिता सर्वानाच सहभाग असावा.