सोलापूर प्रतिनिधी
निलम नगर येथील हनुमान मंदीरात हनुमान जन्मोत्सवनिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेच्या १२१ विद्यार्थ्यांनी हनुमान चालीसा पठण केले.
नेताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 'श्री'चे रुद्राभिषेक व महाआरती करण्यात आले.तदनंतर एम. आय.डी. सी. पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने यांच्या हस्ते भक्तगणांना प्रसाद वाटप करण्यात आले.यावेळी गीता परीवार समूहाचे राष्ट्रीय उपाध्यक्षा श्रीमती संगीता जाधव या उपस्थित होत्या.
अयोध्या येथील श्रीराम मंदिर गर्भगृह निर्माणपूर्ती प्रित्यर्थ आयोजित शतकोटी हनुमान चालीसा महायज्ञ व हनुमान जन्मोत्सव प्रित्यर्थ प्रशालेतील १२१ विद्यार्थ्यांनी ११ वेळा वाद्यवृंदासह सामूहिक हनुमान चालीसा पठण केले.भक्तगण भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सामूहिक हनुमान चालीसा पठणात सहभाग घेतले.
यावेळी गीता परीवार समुहाच्या संगीता जाधव यांनी हनुमान चालीसा पठणाचे महत्व व त्याचे फायदे सांगितल्या. संस्थापक अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांनी हनुमान चालीसा, बजरंग बाण व मारुती स्रोत हे दररोज म्हणण्यासंबंधी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास लिंबीचिंचोळीचे प्रतिष्ठित व्यक्ती सिद्धेश्वर नरोळे , होटगीचे राजशेखर फताटे, लेखा परीक्षक महेश आळंगे, अभियंता महेश थंबकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुभाष धुमशेट्टी, रेवणसिद्ध रोडगीकर, धानय्या मठपती ,संस्थेचे खजिनदार ललिता कुंभार, राजशेखर स्वामी, प्राचार्य विजयकुमार हुल्ले , मुख्याध्यापक रविशंकर कुंभार , मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, वैशाली कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे आदी उपस्थित होते.
दिवसभर निलम नगर परिसरातील भक्तगण हनुमानाचे दर्शन घेतले.नेताजी शिक्षण संकुलातर्फे महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंदिराचे पुजारी शिवानंद स्वामी,विश्वाराध्य मठपती, शैलेश स्वामी,षडाक्षरी हिरेमठ, धर्मराज बळ्ळारी, लक्ष्मीकांत त्रिशुले, शिवकुमार शिरुर, गणपती पाटील आदींनी परिश्रम घेतले.