पंढरपूर प्रतिनिधी
कर्मवीर औदुंबररावजी पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय डॉ. सिकंदर ढवळे यांनी नुकतीच हिंदी या विषयामध्ये P.H.D. ची पदवी संपादित केलेली आहे. आज त्यांचा सत्कार आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी परिचारक म्हणाले की आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्याबरोबरच, मुख्याध्यापक या नात्याने सर प्रशालेचे प्रशासकीय कामकाज देखील प्रामाणिकपणे पाहत असतात. तसेच, सर सामाजिक कार्यातदेखील नेहमीच अग्रेसर असतात. असा सर्व व्याप सांभाळत, अभ्यासासाठी आवर्जून वेळ काढत, २ वर्षे अथक मेहनत घेत सरांनी हे यश प्राप्त केलेले आहे.
सरांचे आत्ता ५६ वय आहे. २ वर्षानंतर ते सेवानिवृत्त होणार आहेत. माणसाने सतत शिकत राहिले पाहिजे. ज्ञानार्जनासाठी वयाचे कोणतेही बंधन नसते. शिक्षक हा आजन्म विद्यार्थीच असतो. हे सरांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलेले आहे. आपापल्या क्षेत्रात वावरत असताना आपण सर्वांनीच सरांचा आदर्श घेतला पाहिजे. असे ही परिचारक म्हणाले.
यावेळी कैलास खुळे, विशाल आर्वे, दाजी पाटील, दिलीप चव्हाण, तानाजी वाघमोडे, राजु शेंबडे, मा. नगरसेवक राहुल नाकाडे, तुकाराम खंदाडे सर, सारंग दिघे, पंडीत शेंबडे,उमेश वायचळ, किशोर काकडे आदी उपस्थित होते.