थोर शिक्षण सुधारक म.जोतिबा फुले जयंतीनिमित्त स्नेहभोजनासह सनराईज परिवाराने केली २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाची सांगता.!!
शेळवे प्रतिनिधी
सनराईज पब्लिक स्कूल शेळवे येथे आज थोर समाज व शिक्षण सुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून माता-पालक व विध्यार्थी सहविचार सभा आणि स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला;चालू शैक्षणिक वर्षाचा धावता आढावा घेऊन पुढील शैक्षणिक वर्षातील ध्येय धोरणे काय असतील.? यावर विचारविनिमय करण्यात आला.
सदर कार्यक्रमास माता पालकांसह विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. जेवणानंतर विध्यार्थी व पालक यांच्या चेहऱ्यावरील आनंद सनराईज परिवारातील प्रत्येक घटकाला एकप्रकारचे समाधान देऊन गेला,पालक-विध्यार्थी व परिवारातील सर्व घटकांचे प्रशालेशी असलेले जिव्हाळ्याचे नातेसंबंध अजूनच दृढ करून गेला.
अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते,आपल्या भारतीय संस्कृती मध्ये अन्नदानाला अनन्यसाधारण महत्व आहे,त्यात जर हे अन्न दान बालगोपाळ अन त्यांच्या पालकांसाठी असेल तर औरच..!!
सरतेशेवटी बेत ठरला,सर्व विध्यार्थी व पालकांना निरोप आणि निमंत्रण देण्यात आलं,मागच्या महिन्यात ट्रिप मध्ये ज्या अकबर मामा आचाऱ्याने सलग तीन दिवस मुलांना अतिशय स्वादिष्ट जेवण घातले होते,त्याच अकबर मामाच्या हाताने आज सनराईज परिवारातील सर्व विध्यार्थी,माता-भगिनी-पालक,प्रशालेचे हितचिंतक या सर्वांना जेऊ घातले,या मध्ये ई.सहावी ते आठवीच्या विध्यार्थ्यांनी खूप परिश्रम घेतले, आपल्या घरातीलच एखादे शुभकार्य आहे असे समजून पाणी देणे,भाज्या चिरणे,लसूण सोलने पासून ते पत्रावळ्या वाटून जेवायला वाढण्यापर्यंत जबाबदारी पार पाडली,त्यामध्ये या सर्वांना अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केले ते वाहतूक विभागातील सदस्यांनी, व शिक्षक कर्मचाऱ्यांनी; या सर्वांच्या मदतीने आजचा कार्यक्रम अतिशय यशस्वीपणे पार पडला...!!
सगळ्यात शेवटी सनराईज पालक परिवाराने सर्व शिक्षक-शिक्षिका वाहतूक विभागातील कर्मचारी या सर्वांना जेऊ घातले अशा रीतीने शैक्षणिक वर्ष 2022-23 ची गोड सांगता करण्यात आली..!!
खरं तर ग्रामिण भागातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील पालक-विध्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांच्यामधील नातं सांगणारा हा एक अतिशय हळवा व भावनिक प्रसंग होता;एका बाजूला शिक्षण क्षेत्रातील वाढती व्यावसायिकता, पालकांचे होणारे आर्थिक शोषण या सर्व गोष्टीला तिलांजली देत दुसऱ्या बाजूला विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटून कमीतकमी शैक्षणिक फी मध्ये दर्जेदार शिक्षण देऊन पालकांना आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्याचा व ग्रामिण भागातील विध्यार्थ्यांना शैक्षणिक समृद्ध बनवण्याचा प्रयत्न सनराईज परिवार प्रामाणिकपणे करत असल्याचा सकारात्मक चर्चा पालकांमधून होताना दिसून येत आहे...!!
पालकांचे अन हितचिंतकांचे आशीर्वाद आणि विध्यार्थ्यांचे प्रेम व शुभेच्छा हीच खरी सनराईज परिवाराची दौलत आहे आणि यातच प्रशालेचे सौख्य सामावलेले आहे...!!
सर्व माता-भगिनी पालक विध्यार्थी हितचिंतकांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा सदैव सोबत राहोत इतकीच माफक अपेक्षा सनराईज परिवाराच्या वतीने करण्यात आली..
यावेळी समाधान गाजरे म्हणाले की आपण सनराईज परिवाराचे निमंत्रण स्विकारून स्नेह भोजनास आलात,त्याबद्दल परिवार आपला शतशः ऋणी आहे..!!