सोलापूर प्रतिनिधी
शनिवार दि. 08 एप्रिल , 2023 सूचना जारी झाल्याची वेळ: 19:00 वाजता (सायंकाळी 07.00वाजता)
हवामान अंदाज:-
भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई च्या अंदाजानुसार पुढील ३ ते 4 तासामध्ये,सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह (वाऱ्याचा वेग ताशी 30-40 किलोमीटर) विजांचा कडकडाट आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सल्ला:-
शेतकरी बांधवांनी स्वतःची आणि जनावरांची काळजी घ्यावी. विजांचा कडकडाट होण्याचा आवाज ऐकण्यास आल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. परिपक्व झालेले पीक काढणी केलेले असल्यास ताडपत्री च्या सहायाने झाकून ठेवावे. अशी माहिती जिल्हा कृषि हवामान केंद्र कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ यांनी सांगितली आहे.