सोलापूर प्रतिनिधी
लायन्स इंटरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी व लायन्स क्लब सोलापूर रॉयल आणि श्वेता व्हनमाने यांच्या महालक्ष्मी मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन व लायन्स क्लब च्या माजी आंतरराष्ट्रीय संचालिका ला. डॉ. अरुणाजी ओसवाल यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून लायन्स क्लबच्या वतीने लायन्स अरुणोदय महिला सप्ताह अंतर्गत महालक्ष्मी मोटर ड्रायव्हिंग स्कूल विजापूर रोड येथे महिलांना महिलांकडून अल्पदरामध्ये चार चाकी वाहन चालवण्याच्या प्रशिक्षणाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.
त्यानंतर बोलताना लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी चे अध्यक्ष ला. इंजि. सागर पुकाळे यांनी म्हणाले की आम्ही काळाची गरज लक्षात घेऊन महिलांना स्वावलंबन बनवण्यासाठी अत्यल्प दरात १ महिन्याचा चार चाकी वाहन चालवणे प्रशिक्षण हा उपक्रम महालक्ष्मी मोटर ट्रेनिंग स्कूलच्या सहकार्याने घेत असल्याचे सांगितले तरी याचा जास्तीत जास्त महिलांनी सुविधेचा लाभ घ्यावा याविषयी अधिक माहितीसाठी सौ. श्वेता व्हनमाने मो. 9420339240 यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान केले.
यावेळी लायन्स क्लब सोलापूर रॉयल चे अध्यक्ष ला. डॉ. शिवाजी पाटील झोन चेअरमन ला. शैलेश कोरवार प्रांतीय सभापती ला. नंदिनी जाधव सेवा सप्ताह प्रमुख ला. नागेश बुगडे ला. ममता बुगडे ला. उर्मिला खेरुडकर ला. गणेश खेरुडकर ला. राजिव देसाई ला. नितीन साळुंखे व महालक्ष्मी मोटर ट्रेनिंग स्कूलचे श्री व सौ.व्हनमाने यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.