वरळी प्रतिनिधी
शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष म्हणजेच महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आशीर्वाद यात्रेमध्ये सहभागी होत आज शिवसेना प्रमुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मुंबईकर जनतेकडून आशीर्वाद घेतले.
वरळी येथील जांभोरी मैदानापासून सुरू झालेल्या या आशीर्वाद यात्रेमध्ये हजारोंच्या संख्येने बाईकस्वार सहभागी झाले होते. दक्षिण मुंबईतील वरळी, शिवडी, लालबाग, आर्थर रोड, भायखळा या विभागांतील नागरिकांचे आशीर्वाद घेत यात्रा महालक्ष्मीपर्यंत येऊन पोहोचली. या यात्रेत असंख्य मुंबईकरांनी आशीर्वाद यात्रेचे जागोजागी स्वतःहून स्वागत करत या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, शिवसेनेचे विभागप्रमुख यशवंत जाधव, आमदार यामिनी जाधव, शिवसेना सचिव सुशांत शेलार, शिवसेनेच्या महिला संघटक आशा मामेडी तसेच शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच मुंबईकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.