सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर येथील दमानी नगर मधील नानजकर हॉस्पिटलमध्ये 8 मार्च महिला दिनानिमित्त महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे अशी माहिती डॉ. कल्पना नानजकर यांनी दिली.
या शिबिरामध्ये महिलांच्या मध्ये असणारे कंबर दुखी, पाठ दुखी, गुडघेदुखी, मणक्याचे आजार, वांग, मुळव्याध, फिशर, पिस्तुला, केस गळती, कोंडा, फंगल इन्फेक्शन, डार्क सर्कल अशी विविध आजारांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे हे शिबिर महिला दिनानिमित्त 8 मार्च ते 11मार्च पर्यंत सुरू असून सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे.
यावेळी डॉ. सारिका होमकर डॉ. अपर्णा इंगळे, डॉ. वैशाली आगावणे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. रुग्णांना संपर्कासाठी मोबाईल नंबर 98 50 55 83 43. तरी या शिबिरास जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन डॉ. कल्पना नानजकर यांनी केले आहे.