माळशिरस प्रतिनिधी
माळशिरस चे पीआय दिपरत्न फडतरे यांची अकलूज येथे बदली झाली, तर सोलापूर मुख्यालयातून पीआय राजेंद्र टाकणे यांची माळशिरस येथे बदली झाली आहे.त्यांनी आज पदभार स्वीकारल्यानंतर सत्कार करण्यात आला.
पीआय राजेंद्र टाकणे यांनी विविध ठिकाणी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून उत्कृष्ट काम केले असून प्रशासकीय सेवा बरोबरच विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत,१९९५ बैचचे अधिकारी आहेत.
सोलापूर मुख्यालयातून नुकतीच त्यांची माळशिरस येथे बदली झाली असून माळशिरस पोलीस स्टेशन चा पदभार त्यांनी स्वीकारलेला आहे.
पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी मुंबई, पंढरपूर, करकंब, वैराग, औसा, परभणी शिरूर, कोल्हापूर,पुणे,या विविध ठिकाणी उल्लेखनीय कार्य केलेले आहे.म्हसवड पत्रकार संघातर्फे त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे.माणदेशी न्यूज चे संपादक , जेष्ठ पत्रकार विजय टाकणे यांचे ते कनिष्ठ बंधू आहेत.