पंढरीत जन्मजात बालक ते अठरा वयोगटातील मुलांची मोफत तपासणी
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर येथील सुप्रसिद्ध डॉक्टर शितल शहा यांच्या नवजीवन मल्टी स्पेशलिटी चिल्ड्रन हॉस्पिटल व राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम सोलापूर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जन्मजात बालक ते अठरा वयोगटातील मुलांची ह्रदया सबंधीत मोफत २ डी.इको. तपासणी शिबिर आयोजित केले होते. यास मोठा प्रतिसाद मिळाला.
या शिबिरामध्ये सुमारे दोनशे जन्मजात बालक ते १८ वर्षापर्यंत असणाऱ्या बालकांची मोफत तपासणी,उपचार, शस्त्रक्रिया बाबत डॉ.संतोष जोशी डी वाय पाटील हॉस्पिटल पुणे,डॉ शितल शहा,डॉ सुधीर आसबे,डॉ रविराज भोसले,डॉ प्रथमेश लोहोकरे डॉ आबा गायकवाड यांनी तपासणी करून पुढील उपचारासाठी मार्गदर्शन केले.
लहान मुलांसाठी दैवत समजले जाणारे डॉक्टर शितल के शहा यांनी यापूर्वी अशा प्रकारचे उपक्रम राबवून गोरगरीब जनतेला मोफत तसेच कमी खर्चात उपचार करून दिले आहेत.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन शासनाच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अशा शिबिराच्या माध्यमातून अनेक बालकांना लाभ होत असल्याचे रुग्णांच्या पालकातून सांगितले जाते.