करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील राजुरी या गावात राहणाऱ्या सुरेखा मोहन साखरे यांचा अपघात झाला. अपघात भीषण होता, तसेच फ्रॅक्चर असल्याने खर्च जास्त होता.
त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी वैद्यकीय सहाय्यक गणेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला, गणेश चव्हाण यांनी लगेच कागदपत्रांची यादी दिली, बारामती येथील गावडे हॉस्पिटलच्या मदतीने त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी साठी अर्ज केला. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे OSD मंगेशजी चिवटे सरांच्या माध्यमातून सदर फाईलचां पाठपुरावा केला.
आणि रुग्णाला खर्च भागविण्यासाठी तब्बल 75 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळवून दिले. रुग्णाच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , मंगेश चिवटे , गणेश चव्हाण यांचे आभार मानले.