नवी मुंबई प्रतिनिधी
नवी मुबंई विभागातील कोपरखैराणे येथे आनेक वर्षों राहून लोकांची आपूलकी संपादन केलेले मकाम पिंपरखेड ( ता.शिरूर ) जि पुणे येथील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे निवृत्त कर्मचारी सदाशिव उमाजी बोंबे यांचे वृध्दापकाळाने नुकतेच निधन झाले. मृत्यूसमयी ते ७५ वर्षांचे होते.
नवी मुबंई येथून प्रसिध्द होणाऱ्या उद्योग नगरी, सरकार राज, महानगरी एक्सप्रेस या वृत्तपत्रांचे पत्रकार व प्रिंटर्स- डिझाईनर संतोष बोंबे व योगेश बोंबे यांचे ते वडील होत.
स्वर्गीय सदाशिव बोंबे यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, मुले, मुली, सूना, नातवंडे तसेच भाऊ-बहीण असा मोठा परिवार आहे. अत्यंत मनमिळाऊ, प्रेमळ स्वभावाचे आणि परोपकारी वृत्तीचे असलेले श्री. सदाशिव बोंबे हे शांत, संयमी आणि अजातशत्रू म्हणून बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये व आपल्या गावात सुपरिचित होते. ते बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये कर्मचारी असताना असताना कर्मचाऱ्यांशी त्यांचे अतिशय मित्रत्वाचे व जिव्हाळ्याचे संबंध होते. कामाव्यतिरिक्त ते जास्तीत जास्त काळ धर्मकार्यामध्ये रमत आसत सुरुवातीच्या काळात वारकरी संप्रदायातील भजन, कीर्तनामध्ये ते आवर्जून उपस्थिती दर्शवीत. नंतरच्या काळात बाबा हरदेवसिंह महाराज यांच्या निरंकारी सत्संगामध्ये नियमित जात. अशाप्रकारे ते धर्मकार्यामध्ये रमले. आयुष्यभर निर्व्यसनी राहून त्यांनी शाकाहार जोपासला.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताचत्यांच्या पिंपरखेड येथील निवासस्थानी मोठा समुदाय अंतीम दर्शनास लोटला होता. मान्यवरांसह आप्तस्वकीयांनी त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन घेऊन बोंबे परिवारचे सांत्वन केले. त्यांच्या अंत्ययात्रेत विविध स्तरातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांमध्ये मा.सरपंच श्री.दामोदरशेठ दाभाडे, मा.उपसरपंच श्री.रामदासशेठ ढोमे, शिरुर तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री.माऊलीशेठ ढोमे, मा.उपसरपंच श्री.नवनाथशेठ पोखरकर, मा.प्राचार्य श्री.लक्ष्मण वाळुंज, मा. सरपंच श्री.शरदशेठ वाळुंज, मा. सरपंच श्री.महेंद्रशेठ वाळुंज,मा. सरपंच श्री.मनोजशेठ तांबे याचबरोबर विविध मान्यवर उपस्थित होते.
त्यांचा दशक्रिया विधी शनिवार दिनांक ४ मार्च २०२३ रोजी पिंपरखेड येथील घोडनदीच्या तीरावर होणार आहे.