पंढरपूर प्रतिनिधी
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विवेक वर्धिनी विद्यालय पंढरपूर येथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा मंडळाची इयत्ता दहावी परीक्षा केंद्र असून या केंद्रावर पहिल्याच मराठीच्या पेपरला सर्व परीक्षार्थींना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत व परीक्षेच्या शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
प्रशालेचे प्राचार्य राजेंद्र पाराध्ये,यांचे हस्ते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देण्यात आले.या केंद्रावर 9 ब्लॉक असून येथे एकूण 208 विद्यार्थी परीक्षा देत आहेत.कॉफिमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी येथे बैठे पथक,भरारी पथक, पोलिस,होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी उपमुख्याध्यापक तुकाराम कौलगे,पर्यवेक्षक सुनील पाटील,उपकेंद्र संचालक अशोक पवार, राजुभाई मुलाणी,सुनील विश्वासे, दत्तात्रय निकम,सर्व परीक्षा पर्यवेक्षक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, परीक्षार्थी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.