अकलूज प्रतिनिधी
अकलूज स्त्री आरोग्य तज्ञ संघटना व महाराष्ट्र स्त्री आरोग्य तज्ञ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शंकरनगर अकलुज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील स्मृती भवन येथे 'प्रश्न तुमचे उत्तर तज्ञांचे' यानुसार सिझेरियन प्रसूती चर्चासत्र आयोजित केले होते.
डाॅटर माॅम फाउंडेशनच्या व शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ.शीतलदेवी मोहिते-पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
या वेळेस आपल्या संस्थेतील विजयसिंह मोहिते-पाटील नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सिझेरियन बाबतचे अधिकचे वैद्यकीय ज्ञान प्राप्त व्हावे या क्षेत्रातील तज्ञ डाॅक्टरांचे मार्गदर्शन मिळावे म्हणून मा.सौ.शितलदेवी मोहिते-पाटील यांनी विद्यार्थांना देखील आपल्या सोबत चर्चासत्रात सहभागी करून घेतले होते.
या चर्चासत्रात बोलताना सौ.शितलदेवी मोहिते-पाटील म्हणाल्या पूर्वी महिलांच्या प्रसुती दरम्यान त्यांच्या सोबत त्यांच्या आत्या मावशी किंवा घरातील एखाद्या महीला सदस्या असायच्या आजच्या बदलत्या आजच्या व्यस्त जिवन शैलीत नातेवाईकांचा मुलीशी विशेष संबंध राहत नाही जो-तो आपल्या कामात व्यस्त राहतो.
सध्या महिलांच्या प्रसुती काळात व नंतर काळजी घेणारी आपली आत्या मावशी म्हणजे नर्सिंग क्षेत्रात सेवा देणारे मुले आणि मुलीच असणार आहेत.हेच नर्सिंगचे विद्यार्थी काळजी घेणार आहेत त्यांना या सिझेरियन बाबतचे अधिकचे ज्ञान गरजेचे आहे. तज्ञ डॉक्टरांनी या मुलांना विद्यार्थांना मार्गदर्शन करावे असे सौ.शितलदेवी मोहिते-पाटील म्हणाल्या .
प्रसंगी डाॅ.राजेंद्र परदेशी ,डाॅ.सुजाता शिंदे,डाॅ.मोनिका उमरदंड,डाॅ.मनिषा शिंदे,बालरोग तज्ञ डॉ. राजीव राणे, डॉ. नितीन एकपुरे,डाॅ.रेवती राणे, डॉ. अभिजीत बडवे, व डॉ. प्रवीण शिंदे,डाॅ.वंदना गांधी,डाॅ.प्रिया कदम व इतर मान्यवर उपस्थित होते.