अकलूज प्रतिनिधी
"पत्रकारांनी स्वत:च्या आरोग्याची सुद्धा 100 % काळजी घेतली पाहिजे" कारण आपणापैकी पाच ते सहा जणांची शुगर वाढलेली आहे. सामाजिक आरोग्य जपणारांनी स्वतःच्या आरोग्या कडेही लक्ष दिले पाहिजे असा काळजी युक्त आपुलकीचा मौलिक सल्ला नामांकित हृदयरोग तज्ञ डॉ. एम. के. इनामदार यांनी पत्रकारांना दिला. गत चार वर्षापासून हृदयरोग तज्ञ डॉ.मनोहर कालिदास इनामदार यांच्या संग्रामनगर अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये माळशिरस तालुक्यातील पत्रकारांची वर्षातून एकदा मोफत आरोग्य तपासणी केली जात आहे. अश्विनी हॉस्पिटल आणि माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून वर्षातून एकदा पत्रकारांच्या मोफत आरोग्य तपासणीचे शिबिराचे आयोजन करण्यात येते.
यावेळी पत्रकारांच्या वतीने डॉक्टर इनामदार आणि त्यांच्या सहकारी स्टाफ यांचा सन्मान करण्यात आला. तेव्हा ते बोलत होते. दिनांक 4/3/2023 रोजी डॉ. एम. के. इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अनिकेत एम्. इनामदार, डॉ. आनंद मस्के, डॉ. अतुल जोशी, संदेश शंकरराव पानसरे, नितीन एडवीन तुरूकनडोणी, विकास दिलीप घोळवे, उदय निकम, संभाजी पाटोळे, शैलेश नारायण कुलकर्णी, विनोद प्रल्हाद देवकुळे, सुरज संजय सरवदे, डॉ.तमन्ना शेख, जयसिंग थोरात, पांडुरंग अनपट यांनी या आरोग्य तपासणी शिबिरासाठी परिश्रम घेतले.
वयाच्या सोळाव्या वर्षी पत्रकारिता सुरू करून अखंड पन्नास वर्षे पत्रकारितेमध्ये काम करीत असलेले सर्वजेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे (संस्थापक संपादक अकलूज वैभव, वृत्त एकसत्ता, aklujvaibhav.in,) यांची सर्वप्रथम आरोग्य तपासणी करून शिबिराची सुरुवात करण्यात आली. शिबिरामध्ये तालुक्यातील 34 पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.