सोलापूर एसटी महामंडळाचा अजब कारभार; चोर सोडून सन्यशाला फाशी
पंढरपूर प्रतिनिधी
दिनांक 03 मार्च रोजी सांगोला आगाराची स्वारगेट सांगोला ही बस स्वारगेट हून सांगोला कडे येत असताना जेजुरीच्या पुढे चालक बस व्यवस्थित चालवत नसल्याचे वाहक आणि प्रवाशांच्या लक्षात आले, यावेळी त्यांनी सदर बस थांबवून वाहक तसेच प्रवाशांनी चालकाला या बाबत विचारले असता त्याने दारू पिल्याचे दिसून आले यावेळी वाहकाने सदर बस चालविण्यास चालकास मज्जाव केला व गाडीतील त्यावेळी असलेले 52 प्रवाशी दुसऱ्या गाडीत पाठवने चालू असताना पुढे पाठवलेल्या प्रवाशांनी सदर झालेल्या घटनेची माहिती निरा बस स्थानकात असलेल्या बस तपासणी पथकास दिली. सदर घटनेची माहिती मिळताच बस तपासणी पथक घटनास्थळी पोहोचले व त्यांनी सदर ठिकाणी थाबलेल्या बसच्या चालकाची तपासणी केली असता सदर चालक नशेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले व यावेळी वाहकाने राहिलेल्या प्रवाशांनी दुसऱ्या बस मध्ये पाठवून दिले.
जेजुरी बस स्थानकात बसची नोंदणी करून आल्यावर चालकाची बस चालवण्याची पध्दत बदलली होती व तो बस वेडीवाकडी तसेच ब्रेक मारत चालवत होता ज्यावेळी चालक बद्दल संशय आला यावेळी समय सूचकता दाखवून वाहकाने सदर बस पुढे न जाऊ देता चालकाला तेथेच बस थाबवण्यास भाग पाडले व ५२ प्रवाशांच्या जीवन धोक्यात जाण्यापासून रोखले.
सदर घटनेला चालका बरोबर निर्दोष वाहकास सुद्धा जबाबदार धरून कारवाई करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे यामुळे चालक वाहक यांच्यामध्ये सदर होत असलेल्या कारवाई विषयी नाराजी असल्याचे दिसून येत आहे. वाहकाने केवळ प्रथम अधिकाऱ्यास का कळवले नाही म्हणून जबाबदार का धरू नये अशी नोटीस बजावल्याचे माहिती मिळत आहे. सदर वाहकाने घटना स्थळावरील प्रसंग नुसार प्रथम प्रवाशांची गैरसोय होऊ नये व जनमानसातील प्रतिमा खराब होऊ नये म्हणून प्रथम प्राधान्य प्रवाशांची पुढील प्रवासाची सोय करण्याला दिले यामुळेच वाहकाला दोषी ठरवण्यात येत असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते.
भूम आगारात खराब बस मार्गावरून पाठवल्यावरून अधिकाऱ्यांनी वाहन परीक्षक यांना जबाबदार धरून त्याचे निलंबन केले, हे प्रकरण ताजे असतानाच आता सदर घटनेबाबत जेजुरी वाहतूक नियंत्रक कशात बस नोंदणी करण्यासाठी चालक गेला असता त्यांना या चालकाच्या बद्दल संशय आला नाही का ? यांना जबाबदार न धरता वाहकाने समजल्यावर बस थांबवली तरीसुद्धा केवळ वाहकाला बळीचा बकरा करत असल्याचे दिसते आहे. यामुळे कारवाई फक्त कर्मचारी वर्गवरच होते अधिकारी कुठेच कसा जबाबदार धरण्यात येत नाही बद्दल सुद्धा दबक्या आवाजात कर्मचारी वर्गामध्ये चर्चा होत आहे.
महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळाच्या अधिका-यांच्या मनमानी कारभारामुळे चालक आणि वाहक तसेच इतर कर्मचारी सध्या तनावात असून कर्मचाऱ्याचा मनात असंतोष निर्माण झाला आहे. त्यातच कमी म्हणून सोलापूर जिल्हा एस टी विभागीय वाहतूक अधिकारी यांनी कोणतीही माहिती न घेता चालकांनी नशा केली म्हणून वाहकाला देखील निलंबित केल्याने अधिका-यांच्या विषयी कर्मचारी वर्गात असंतोष पसरला आहे.